रामटेक: शिरपूर शेत शिवारात चरत असलेल्या दुधाळ गाईवर वीज पडल्याने गाईचा जागीच मृत्यू
Ramtek, Nagpur | Sep 21, 2025 रामटेक जवळील शिरपूर येथील शेत शिवारात रविवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान वीज पडल्याने एका दुधाळ गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत पशुपालक थोडक्यात बचावला. शिरपूर येथील पशुपालक गोमा नत्थू निकुरे यांची मालकीची ही गाय होती. ते परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण गोल्हार यांच्या शेतात जवळ पशु चारत होते.