रामटेक: राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहरात केले विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
Ramtek, Nagpur | Oct 17, 2025 आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून रामटेक शहरातील विविध ठिकाणी पूर्णत्वास आलेल्या विकास कामांचे लोकार्पण व होऊ घातलेल्या विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता पासून रामटेक शहराच्या विविध ठिकाणी करण्यात आले. भूमिपूजन केलेली कामे लवकरच पूर्णत्वात येत असून त्याचा लाभ शहरावासीयांना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.