भारतीय जनसेवा मंडळ रामटेक द्वारा महामुनी अगस्ती आश्रम गडमंदिर येथील अन्नछत्रात नि:शुल्क भोजनदानाला बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. माजी आमदार तसेच भारतीय जनसेवा मंडळाचे महासचिव डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते या अन्नछत्राची सार्वजनिक रूपाने सुरुवात करण्यात आली. यावेळी सचिव सुभाष बघेले,विनायक डांगरे,दिलीप रेवतकर, नत्थूजी घरजाडे प्रामुख्याने उपस्थित होते.