वाशिम: वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त टिळक चौक येथे वंदे मातरम’ गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न
Washim, Washim | Nov 7, 2025 वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त टिळक चौक येथे दि. 7 नोव्हेंबर ’वंदे मातरम’ गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न झाला. यावेळी वंदे मातरम गीताच्या सार्धशताब्दीचे औचित्य सांगत, या गीताचा इतिहास, त्यातून व्यक्त होणारी देशभक्ती याचे महत्व समजून सांगण्यात आले. यावेळी महिला पुरुष व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.