मोर्शी: मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदू यावलकर, यांनी अधिवेशनातून उद्यान विभागाची केली मागणी
आज दिनांक 11 डिसेंबरला दुपारी दोन वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी वरूड मतदार संघाचे आमदार चंदू भाऊ यावलकर यांनी मतदारसंघातील मोर्शी वरूड,शेंदुजनाघाट नगरपरिषद क्षेत्रात उद्यानविभागाची मागणी करून मतदार संघातील विविध समस्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून मांडण्यात आल्या. मतदार संघात असलेल्या अनेक विकास कामाच्या बाबतीत चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे कळते