नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी, तहसील कार्यालय काटोलच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत रिधोरा येथे 'समाधान शिबिराचे' यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये तालुक्यातील विविध शासकीय विभागांनी आपले स्टॉल्स लावले होते.