उमरखेड येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक महसूल अधिकारी निरंजन धनसिंग पवार वय 41 यांना दिव्यांग प्रमाणपत्राच्या नावाखाली 1 लाख 30 हजार रुपयांची खंडणी मागत शिवीगाळ व जिवाने मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.