जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असून या परिसरात मौल्यवान खनिज संपत्तीचा साठा असल्याची माहिती आहे या भूगर्भातील खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी सहा ते बारा डिसेंबर या कालावधीत गोंदिया तालुक्यातील बिरसी परिसरात सिंगल इंजिन विमानाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे यात मौल्यवान खनिज संपत्तीचा शोध लागला जिल्ह्याला विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे