आमगाव: आमगावातून २० हजारांची बाईक चोरी,शहरातील गांधी चौक परिसरात घटना
Amgaon, Gondia | Sep 19, 2025 शहरातील गांधी चौक परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने एमएच ३५ एएन २०५७ ही चोरून नेली आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश लखनलाल असाटी (४०) रा. बनिया मोहल्ला, आमगाव यांनी आपली ही दुचाकी गिरजा बर्तन दुकानासमोर, गांधी चौक, आमगाव येथे उभी केली होती. तेवढ्यात संधी साधून अज्ञात चोरट्याने ती बाईक चोरून नेली. चोरलेल्या वाहनाची किंमत २० हजार रुपये आहे. या