मुरगुड येथे बेकायदेशीर गांजा या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयित आरोपी प्रमोद भोई याला पकडून त्याच्याकडून एक किलो 300 ग्राम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 41 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती आज कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.