वाई: किल्ले चंदन-वंदन गडावर शिवकालीन स्मृतींना उजाळा; विजयोत्सवाचा उत्साहात जल्लोष
Wai, Satara | Nov 29, 2025 किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध घडून ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांना मुक्त करण्याची मोहिम वेगात सुरू केली. या मोहिमेतील सर्वप्रथम ताब्यात घेतले गेलेले किल्ले म्हणजे चंदन-वंदन. इतिहासातील या विजयी क्षणाची परंपरा आजही जिवंत ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले चंदन-वंदन गडावर भव्य विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी सात वाजता पारंपरिक पद्धतीने उत्सवाची सुरुवात झाली.