गव्हा फरकाडे येथील चंदू वानखडे या तरुणास काही इलेक्ट्रिक शॉक लागून गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून वानखडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून कुटुंबात कमावणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नसल्याने माजी सरपंच मुकेश राठी यांनी ग्रामस्थांना आर्थिक साह्याचे आवाहन केले व ग्रामस्थांनी एक लाख रुपये जमा करून वानखडे कुटुंबीयांना मदत म्हणून दिल