कोपरगाव: कोपरगावचे आ.आशुतोष काळे संकल्पित विकासाचा महामेरू गौरवग्रंथाचे मुंबईत हॉटेल ट्रायडेंट येथे प्रकाशन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यावर आधारित कोपरगावचे आ. आशुतोष काळे संकल्पना असलेले व व्हिझन इंडिया सर्व्हिसेचे संचालक गणेश अंबिलवादे यांनी संपादित केलेल्या 'विकासाचा महामेरू' या गौरवग्रंथांचे प्रकाशन मुंबई येथील हॉटेल ट्रायडेंट येथे आज ७ ऑक्टोबर रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व मंत्री उपस्थित होते.