आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना मुख्यमंत्री
आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईद्वारे आयोजित 'नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत' कार्यक्रमाचा शुभारंभ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी कृतसंकल्पित झाला आहे. आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.