वर्धा: *विकसित भारतासाठी समर्पित होऊन काम करा : प्रो. शर्मा*
Wardha, Wardha | Jul 23, 2025 वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात महान स्वातंत्र्यसंग्राम सेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा म्हणाल्या की चंद्रशेखर आझाद यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे आचरण आपल्या जीवनात उतरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाल्या की विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, निष्ठा आणि देशासाठी समर्पणाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.