चांदूर रेल्वे: "एक दिवा वंचितांसाठी" "पालावरची दिवाळी" या उपक्रमा अंतर्गत भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी लालखेड येथे केली दिवाळी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली "एक दिवा वंचितांसाठी" "पालावरची दिवाळी" या उपक्रमा अंतर्गत भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी लालखेड येथे भटक्या विमुक्त समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. व त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्यासोबत संवाद साधला