लाखांदूर: चपराड पहाडी येथील दुर्गा माता मंदिरात 939 घटांची स्थापना ;भाविकांची अलोट गर्दी
तालुक्यातील लाखांदूर ते वडसा मार्गावर निसर्गरम्य चपराड पहाडी असून या पहाडीवर नवदुर्गा मातेची मंदिर हे जागृती देवस्थान असून या देवस्थानाकडून मागील 55 वर्षांपूर्वी पासून घटस्थापनेची परंपरा कायम आहे तर यंदा लाखांदूर परिसरातील नागरिकांसह आंतरराज्यातील व अंतर जिल्ह्यातील भाविकांच्या तब्बल 939 घटस्थापना झाली आहेत अशी माहिती नवदुर्गा माता मंदिर समितीच्या वतीने तारीख 23 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता दिली आहे