देवळी: शिरुड प्रकल्पाचा फटका: देवळी-पुलगावमध्ये ८० एकर जमीन बाधित: आमदार बकानेंची दखल तात्काळ अधिग्रहण करण्याचे निर्देश
Deoli, Wardha | Sep 17, 2025 देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून शिरुड लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे त्रस्त झाले आहेत. या प्रकल्पामुळे १६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असला, तरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जवळपास ८० एकर जमीन बाधित होत असल्याचं समोर आलं आहे. या समस्येची दखल घेत देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. असे आज 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7वाजता प्रसिद्धीस दिले