रत्नागिरी: मिरजोळे एमआयडिसी येथे पोलिसांची अनैतिक व्यवसायावर कारवाई; नेपाळी महिला ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका नेपाळी महिलेला अटक केली असून, ती पुणे येथील दोन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एमआयडीसी रत्नागिरी येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक (डमी गिऱ्हाईक) पाठवून सापळा रचला.