आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर येथील नगर परिषदेतील दोन प्रभागांच्या निवडणूका येत्या २० तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग ४ आणि प्रभाग ६ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज गंगापूर येथील प्रभाग ४ खर्डे वस्ती, हेलाडे वस्ती, खदान परिसर रोकडे यांच्या घरासमोर व प्रभाग ६ येथे दत्तनगर, साई नगर आणि मन्सूरी कॉलनी बागवान गल्ली येथे कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले.