राहुरी: टाकळीमिया परिसरातून विवाहित तरुणी बेपत्ता
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ परिसरातून एक विवाहित तरुणी गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून सदर तरुणी कोठे आढळून आल्यास राहुरी पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. सविता महेंद्र कोळसे, वय २९ वर्षे असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे.