भडगाव: Bhadgaon एकाच कुटुंबातील तीन बेपत्ता मुलींची अखेर सुटका, भडगांव पोलिसांची उत्तम कामगिरी...
भडगांव तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली शोधून काढण्यात भडगांव पोलिसांना यश आले असून याप्रकरणी संशयित तिघेही आरोपी ताब्यात घेत मुलींची सुटका करत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता हाती आली आहे. दि २० ऑक्टोबर २०२५ रोजी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातुन ०३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समजुन आल्याने बेपत्ता मुलीचे नातेवाईक यांनी गावात तसेच आजुबाजुच्या परिसरात सदरील बेपत्ता मुलींचा शोध घेतला.