विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत लखमापुर लघुपाटबंधारे प्रकल्प, पिपळधरा ता. हिंगणा येथील मालकी हक्काचे पट्टे पाटप कार्यक्रम आज तहसिल कार्यालय हिंगणा येथे पार पडला. या कार्यक्रमात एकुण 183 लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. लखमापुर प्रकल्पाचे 90 % काम पुर्ण झाले असुन उर्वरीत 10% काम मार्च 2026 पर्यंत पुर्ण होईल. अशी माहीती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किशोर दमाह यांनी सांगीतले.