सासवड येथील गोळीबार प्रकरणी सासवड पोलिसांनी आणखी एकाला घेतले ताब्यात
Purandhar, Pune | Jul 22, 2024 पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहुल टिळेकर या व्यवसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतूस त्याचबरोबर एका पिस्टलमध्ये अडकलेले पुंगळी सासवड पोलिसांनी जप्त केली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील बस स्थानकासमोर असलेल्या आईस्क्रीम पार्लर येथे मागील आठवड्यात गुरुवारी दुपारी राहुल टिळेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. टिळेकरांच्या पोटामध्ये गोळी लागून ते गंभीरित्या जखमी झाले होते. यानंतर राहुल टिळेकर यांच्या भावाने सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सासवड पोलिसांनी सुरुवातीला दोन आणि त्यानंतर तीन जणांना अटक केली होती. तर सासवड पोलिसांनी आज आणखी एक जनाला ताब्यात घेतले आहे ...