बुलढाणा: शहरातील शाहूनगर येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण
बुलढाणा शहरातील शाहुनगर येथे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता ज्ञान, संस्कृती आणि प्रबोधनाचा वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या ‘प्रगती सार्वजनिक वाचनालय’ या नव्या इमारतीचे लोकार्पण आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे आदी उपस्थित होते.