भुसावळ: भुसावळ येथील बेपत्ता तरुण ओरीसात सापडला, पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन
भुसावळ येथील एक १८ वर्षीय तरुण नशिराबाद येथून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार, त्या तरुणाचा शोध घेत त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती दि. १ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.