लाऊडस्पीकर प्रकरणी जर सरकार सहमत नसेल तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी
मशिदींवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याच्या मुद्द्यावर मुंबई पोलिस आयुक्तांना भेटल्यानंतर महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी आज गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की कायदा आहे आणि वरून दबाव आहे. मी म्हटले की तुम्ही हे फक्त किरीट सोमय्यांच्या दबावाखाली करत आहात. देशात हे कुठेही घडत नाहीये. कायद्याचे उल्लंघन न करता अजान देता येईल यासाठी काहीतरी मार्ग शोधला जाईल. जर सरकार सहमत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मोठे आंदोलन करू.