येथील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीची बैठक
Beed, Beed | Oct 24, 2025 बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी बीड येथील राष्ट्रवादी भवनात  आज शुक्रवार दि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता, कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, ज्येष्ठ नेते डी. बी. बागल, तसेच वैजनाथ तांदळे, के. के. वडमारे, शिवराज बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. “घर तेथे राष्ट्रवादी, बूथ तेथे राष्ट्रवादी” हा नारा देत सत्ता परिवर्तनाचा संकल्प 2025 मध्ये पूर्ण करू असा आत्मविश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला