साकोली: उकारा येथील बोडीत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू,सातलवाडातील रहिवासी संतोष भोंडे असे मृतकाचे नाव
सातलवाडा येथील रहिवाशी असणारा संतोष रामचंद्र भोंडे वय 25 हा उकारा फाटा येथे शिव मंदिर देवस्थानच्या समोरील भेलाई बोडीमध्ये आंघोळीसाठी गेला असता बुडून त्याचा रविवार दि.21 सप्टेंबरला सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला मा.नगरसेवक मनीष कापगते याच्यासह ढिवर समाजाच्या तरुणांनी व साकोली एसटी आगारातील एसटी ड्रायव्हर जनार्धन दोनोडे यांनी मोठ्या प्रयत्नाने तब्बल तीन तास पाण्यामध्ये संतोष याचे प्रेत शोधून काढले संतोष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.