मुखेड: मुखेड शिवारातील धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाला राजुरा बुद्रक येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.
Mukhed, Nanded | Apr 19, 2024 मुखेड तालुक्यातील राजुरा बुद्रुक येथील खंडू सुदामराव कांबळे वय २८ वर्षे याने मुखेड शिवारातील शेतकरी दिगांबर भीमराव पाटील यांच्या शेतातील धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतली आहे. वीट भट्टी मजूर खंडू कांबळे हा दिनांक १४ एप्रिल पासून उच्चा गावात नसल्याची माहिती आहे. ही घटना दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता उघडकीस आली असून या घटनेचा मुखेड पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली