संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान दिग्रस शहरातील मुख्य मार्गाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत लेझीम पथक, वारकरी, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले असून सहभागी भाविकांसाठी चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारले गेले होते. समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.