देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे घेण्यासाठी गेलो असता तेथे अधिकारी उपलब्ध नाहीत,त्यामुळे सत्ताधारी हे सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरत असल्याचा आरोप शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी केला आहे. त्याचबरोबर नुकतेच नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तंगडे काढण्याची भाषा केलेल्या वक्तव्याचा मुसमाडे यांनी समाचार घेत हे फक्त कोंबडीचे तंगडे काढू शकतात, कुठल्याही नागरिकाला हात लावू शकत नाही असा प्रति हल्ला केला.आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना मुसमाडे बोलत होते.