शिरूर: जांबुत परिसरात जबरी घरफोडी; महिलेला मारहाण करत अंगावरील सोनं घेऊन झाला पसार
Shirur, Pune | Oct 19, 2025 शिरूरच्या बेट भागातील जांबुत (शरदवाडी) परिसरात शनिवार (दि. १८) रोजी रात्री साडेआकरा वाजेच्या सुमारास सिंधुबाई शांताराम गुजर या महिलेच्या घरी घरफोडी करून त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या अंगावरील अडीच तोळे सोने ओरबडून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.