जालना शहरातील जालना शहर महानगरपालिके मार्फत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि मतदाराभिमुख राहावी यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील पाच विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.कार्यालयांमध्ये ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संदर्भातील माहिती व जनजागृतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.