सावली: बोगस मतदार नोंदणीचा आरोप : रोहित बोमावार यांच्या नावावर विजय कोरेवार यांचा आक्षेप
देशभरात बोगस मतदार नोंदणीच्या तक्रारींना उधाण आलेले असतानाच सावली तालुक्यातील खेडी ग्रामपंचायतीतही अशाच प्रकाराचा वाद उफाळला आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहित चरणदास बोमावार यांच्या नावाची मतदार नोंदणी खेडी गावात असल्याचे उघड झाल्याने सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी आक्षेप नोंदवत ही नोंद बोगस असल्याचा आरोप केला आहे.