स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातील जागांसाठी खुल्या प्रवर्गातीलच सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी मराठा महासंघाने विविध राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे केली आहे. बुधवार दि. 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार खुल्या प्रवर्गातील जागांवर इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्याची पद्धत अन्यायकारक असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय विभागीय चिटणीस तथा जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी सांगीतले.