नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा येथे घडली.पंजाब दादाराव हटवार (४५)असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेने हटवार परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावावर शोककळा पसरली आहे.