नांदुरा: शेतकरी स्तरावरील खरीप ई– पिक पाहण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ: तहसीलदार अजितराव जंगम यांची माहिती
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधव ही पीक पाणी पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना पीक पाहणी करण्यासाठी संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावरील खरीप पिक पाहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी नांदुरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपली इ–पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम यांनी आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रसारमाध्यमांद्वारे केले आहे.