नवरगाव (कला) ते कातुर्ली या रस्त्याची दुरवस्था आणि वारंवार होणारे जीवघेणे अपघात याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत असल्याने, आता जनतेचा संयम सुटला आहे. या अन्यायाविरुद्ध आणि रस्ता मंजुरीनंतरही काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी रविशंकर तरोणे यांच्