मेहकर: दे.माळी येथील किसन बळी यांची शिवसेना प्रभारी उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील शिवसेना कार्यकर्ते यांची शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रभारी उपजिल्हाप्रमुख पदी किसन बळी यांची एक वर्ष कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्तीपत्र वीस ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या शुभहस्ते शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.