पैठण: पैठण बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे गंठण चोरट्याने केले लंपास
पैठण बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने हात चलाखीने महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे गंठण चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की जायकवाडी येथील वंदना बनसोडे या पतीसह पैठण बसस्थानकाहून छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोने चोरट्याने लंपास केले. ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान पैठण बस स्थानकावरून चोरीच्या घटनेत वाढ झाली