नरखेड: लाडगाव येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सोहळा आज लाडगाव येथे उत्साहात संपन्न झाला.या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.