लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे १७ आक्टोबर रोजी प्रल्हाद मुकींदा पवार हा आपल्या अंगणातील टपरीत अवैधरीत्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी देशी दारूसह ८ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हाद पवार विरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.