मरारटोली परिसरात सार्वजनिक रस्त्यावर ऑटो धोकादायक पद्धतीने उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका ऑटो चालकावर गुन्हा नोंद केला आहे. घटना दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडली. फिर्यादी पोलीस शिपाई अमोल निकोडे यांनी केलेल्या कारवाईत मरारटोली येथे तीनचाकी आटो रस्त्यावर अत्यंत अयोग्य व धोकादायक स्थितीत उभा केला होता. याप्रकरणी आटो चालक इरफान शेख यांच्याविरुद्ध कलम 285 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.