नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या पुढाकारातून आज आडगाव येथील पोलीस मुख्यालयात मुद्देमाल हस्तांतरण, पोलीस पाल्य गुणगौरव आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून आज, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालय, आडगाव येथे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे प्रमुख अतिथ