चंद्रपूर: पूर ओसरला परंतु शेतकऱ्यांची पिके सडली विसापूर परिसरात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात
चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या सतत धार पावसाने निर्माण झालेला पूर आता हळूहळू ओसरत असला तरी त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे विसापूर नांदगाव पोढे ,चारवट व हडसती , माना परिसरात पिकांच्या अतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे शेतकऱ्यांच्या या संकटाकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष देऊन नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे