31 जानेवारीला दुपारच्या सुमारास पोलीस ठाणे केळवद हद्दीतील कपलेश्वर मंदिरात परिवारासोबत दर्शनासाठी आलेल्या एका 17 वर्षीय यश भोला शंकर राठोड हा डोहात बुडाला होता. दरम्यान तेथे उपस्थित लोकांनी त्याला बाहेर काढले आणि त्याला सामाजिक कार्यकर्ता हितेश दादा बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार मिळण्याआधीच मृत्यू झाला. 1 फेब्रुवारीला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी केळवद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली