वाशिममध्ये बालकामगार मुक्ती अभियानाची धडाकेबाज कारवाई ; दोन किशोरवयीन मुलांची सुटका, आस्थापना मालकांवर कारवाई बाल व किशोरवयीन कामगारमुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आज वाशिममध्ये विशेष बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान राबवण्यात आले. अमरावती कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत , अकोला सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे आणि अमरावती सहाय्यक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.