वैजापूर तालुक्यातील मनेगाव-साकेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या २८ वर्षीय तरुणाचा १ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळासाहेब प्रभाकर पवार (रा. मनेगाव, ता. वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २० दिवसांनंतर अज्ञात वाहनचालकाविरोधात शिऊर ठाण्यात शनिवारी (दि. १७) सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.