रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत युवक जागीच ठार झाला. तिरोडा गोंदिया मार्गावरील भाजी बाजारासमोर दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. धर्मेंद्र उदापुरे असे मृतकाचे नाव आहे. फिर्यादी चंद्रशेखर उदापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान भाजी बाजार परिसरातून रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून मृत धर्मेंद्र यांना जोरदार धडक दिली.